मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील खुटवड नगर भागात औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) ते वावरे नगरपर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, उपविभागीय अधिकारी अर्पित चव्हाण, तहसीलदार शोभा पुजारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या रस्त्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.